१८.१०.११
पहिलीच आहे कविता मराठी,
माझ्या आई – बाबांसाठी.
सुचत नव्हते मला दोन शब्द,
हात आणि मन झाले होते स्तब्ध.
होता त्यांच्या लग्नाचा वाढदिवस,
पण आणावे कसे त्यांच्या चेहऱ्यावर हसं?
तिकिटे कुठली? नाटकाची कि सिनेमाची?
पण चांगला नव्हता शो, झाली फजिती.
काही करायचं म्हटलं तर बाबा होते घरी,
कुठे जायचं म्हटलं तर आले असते प्रश्नं शंभरी.
मग सुचली रात्री एक भन्नाट युक्ती,
जशी तशी लिहीन पण केली कविता पक्की.
आशा एवढीच कि आवडतील त्यांना ह्या दोन ओळी,
सादर आहे त्यांच्या लेकीची भेट - एकदम मराठमोळी!
♥ लग्न-वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ♥
नेहा नाईक
No comments:
Post a Comment